औरंगाबाद: अलीकडे महानगरपालिकेच्या कामात नगरसेविकांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढत चालला असल्याचे गेल्या काही दिवसातील घटने वरून दिसून येते. प्रभाग क्रमांक ९ मध्ये रमानगर येथे प्रभागातील एका नगरसेविकेच्या दिराने चार ते पाच जणांसहित जात परिसरात ग्रीन वेस्ट टाकण्यास विरोध दर्शवित काही वेळ गाड्याही रोखून धरल्याचा प्रकार आज बुधवारी सकाळी घडला.
गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटना क्रमानुसार मनपातील महिला नगरसेवकांच्या नातलगांचा मनपातील कामात हस्तक्षेप वाढला असल्याचे निदर्शनाला येते. आज बुधवारी पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला प्रभाग क्रमांक ९ मधील क्रांती चौक वार्डाच्या नगरसेविका शिल्पा राणी वाडकर यांचे दीर पंकज वाडकर यांनी सकाळीच रमानगर येथील कचरा डंपिंग ग्राऊंडवर ग्रीन वेस्ट झाडांच्या फांद्या पालापाचोळा आदी टाकण्यास विरोध दर्शविला. यावेळी त्यांच्याकडून तासभर गाड्याही रोखल्याचा प्रकार घडला असल्याचे समजते. रमा नगर येथे असलेल्या रेड्डी कंपनीच्या कर्मचार्यांना तुम्ही येथे ग्रीन वेस्ट टाकू नका असे पंकज यांनी बजावले. त्यानंतर संबंधित कर्मचार्यांनी ग्रीन वेस्ट टाकण्याकरिता इतरत्र जागा उपलब्ध नसल्याचे नगरसेविकेच्या दिराने अडवल्या कचर्याच्या गाड्यात्यांच्या निदर्शनास आणून दिले. सुमारे तासभर ह्या प्रकरणावरून कंपनी प्रशासनातील कर्मचारी व पंकज यांच्यात वाद सुरू होता. त्यानंतर काही वेळाने पंकज हे तेथून निघून गेल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.
रमानगर येथील जागा पार्किंगसाठी दिलेली असताना त्याचा वापर करणे आणि इतरही वार्डातील कचरा टाकण्यात येत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना कचर्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथून कचरा उचलत असताना मातीसकट कचरा उचलण्यात येतो असा आरोप पंकज वाडकर यांनी केला आहे. वारंवार याबाबत कल्पना देऊन देखील रेड्डी कंपनीचे प्रशासन ऐकायला तयार नाहीत.